English | मराठी

ग्रंथालयाच्या नियम व अटी

१) वाचनालयात वाचण्यासाठी नियतकालिके विनामुल्य वाचण्यास उपलब्ध आहेत.

२) नियामाप्रमाने वर्गणी भरून वाचक सभासद होता येईल त्यासाठी ओळकपत्र व फोटो आवश्यक आहे.

३) दुर्मिळ ग्रंथ ,संदर्भ ग्रंथ ,नियतकालिके व व्रतपत्रे घरी दिले जात नाहीत.

४) वर्गणीदारास एकच ग्रंथ घरी दिला जाईल.

५) वार्षिक वर्गणी एकदाच भरणाऱ्या सभासदाला फक्त दहा महिन्याचे शुल्क आकारण्यात येईल.

६) ग्रंथ १५ दिवसात परत करावा अथवा एकदा नुतनिकरन करून घेता येईल पुढील दर दिवशी एक रुपया विलंब शुल्क आकारण्यात येईल.

७) सभासद खाते बंद करायचे असल्यास सात दिवस अगोदर अर्ज करावा.

८) वाचकांनी ग्रंथ काळजीपुर्वक हताळावेत. त्यात खुणा व लिखाण करू नये.

९) ग्रंथ हरवल्यास त्या ग्रंथाच्या सध्याचा बाजारातील मुल्य आकारण्यात येईल.

१०) एखादे सभासदाने वर्षभरापेक्षा जास्त कालावधीत वर्गणी न भरल्यास , नियामांचे भंग केल्यास त्याचे सभसत्व रदद करण्यात येईल.

११) सभासदाने आपल्या पत्त्यात ,मोबाईल नंबर बदल्यास ग्रंथालयास कळवावा.

१२) सभासदाने खाते बंद केल्यावर अनामत रक्कम सहा महिन्याचा आत परत घेवुन जावी , नाहीतर ती रक्कम वाचनालयात देणगी म्हणुन समविष्ट करण्यात येईल,त्यावर कोणतेही व्याज मिळनार नाही.

१३) ग्रंथालयात मोबाईल बंद ठेवुन शांतताराखावी.

१४) पुस्तक बदलुन घेताना ग्रंथपालाची मदत घ्यावी व त्या पुस्तकाची काळजीपुर्वक नोंद करून घ्यवी.

१५) ग्रंथालय गुरुवार व शासकीय सुट्या सोडुन दररोज सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ पर्यंत उघडे राहील.

१६) ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळाने नियमात केलेले बदल सर्वांना बंधनकारक राहतील.

सभासद वर्गणी
सभासद प्रवेश शुल्क वाचक अनामत मासिक वर्गणी वार्षिक वर्गणी
सर्वसाधारण सभासद 10 300 30 300
महिला सभासद 10 200 20 200
बाल वाचक 10 100 10 100
जेष्ठ नागरीक 10 300 20 200

ठळक बाबी :


  Copywrite 2013 ishwargranthalaya
Design by Uma