English | मराठी

मान्यवरांच्या भेटी व अभिप्राय

       "श्री गुरु ईश्वर शिवाचार्य महाराज सार्वजनिक वाचनालयाला भेटण्याचा योग आला. पुस्तक संग्रह पाहिला, चांगली पुस्तके वाचकांच्या प्रतिक्षेत आहेत. संचालक मंडळी उत्साही व कल्पक आहेत. अन्य कार्यक्रमाचे ही आयोजन, प्रबोधन करण्याची अद्यावत कल्पना आहे. असे प्रभावी लोकशिक्षण करण्याचे माध्यम वाचनालयाला बनविता येर्इल. उत्साही संचालक मंडळ यशस्वी होईल असा विश्वास वाटतो त्यांच्या समाजोपयोगी लोकशिक्षणाला शुभेच्छा!"
गंगाप्रसादजी अग्रवाल   (सर्वोदया नेता )
       " आज दिनांक २३/०९/१९९९ रोजी श्री गुरु ईश्वर शिवाचार्य महाराज सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्याच योग आला. गेल्या वर्षीच मान्यता मिळालेल्या ग्रंथालयाचे विविध उपक्रम पाहून समाधान झाले. वाचनालयाची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा."
का.मा.शेजूळ   (ग्रंथालय संचालक,म.रा.मुंबर्इ )
       "श्री गुरु ईश्वर शिवाचार्य महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या ४थ्या वर्धापन दिनानिमित्त भेट देण्याचा योग आला. कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतूक करावे तितके थोडेच आहे. कुठलाही स्वार्थ त्यांच्यात दिसत नाही. कामाची आवड, जिद्द दिसत आहे अभिलाशा नसल्यामुळे निश्चितपणे हे वाचनालय पुढे चांगले वाढेल याचा विश्वास वाटतो त्यांचे अभिवृध्दी करिता माझ्या हार्दिक शुभेच्छा! "
डॉ.ज.मु.मंत्री   (प्राचार्य, आदर्श महाविद्यालय,हिंगोली )
       "आज दिनांक १९/ १२/ २००० रोजी श्री गुरु ईश्वर शिवाचार्य महाराज सार्वजनिक वाचनालय वसमत येथे ग्रंथालय तपासणी निमित्ताने भेट दिली. असता ग्रंथालयाचे काम पाहून आनंद वाटला. ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी उत्साही व निस्वार्थी असल्याने या ग्रंथालयाचा विकास निश्चित होर्इल.
या ग्रंथालयाची सतत प्रगती होवो ही शुभेच्छा "
मा.सो.कांबळे   (सहा.ग्रंथालय संचालक, औरंगाबाद )
       "वसमत सारख्या छोटया व आर्थिक प्रगती नसलेल्या गावात साहित्य, कला व संस्कृती यांच्या अभिवृध्दीसाठी रंगसभा करीत असलेल्या कामाला शुभेच्छा. "
न्या. नरेन्द्र चपळगावकर   (न्यायमूर्ती, हायकोर्ट)
       "रंगसभा चे सर्व उपक्रम आदर्शाचा मानदंड ठरणारे आहेत. कलासंपन्नता हा या सभेचा वारसा आहे. कार्यकर्ते तो जिद्दीने चालवितात. रंगसभेच्या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा. "
लक्ष्मीकांत तांबोळी   (सुप्रसिध्द कवी )
       "“रंगसभा” वसमत या संस्थेने माझे मित्र श्री.रमेश कोठीखाने यांच्या रंगरेषा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला. रंगसभा वसमत येथून नवनवीन प्रकल्प घेऊन सृजनात्मक चळवळी करू पाहते. या चळवळीचे आज रोपटे असले तरी निष्ठेने ही चळवळ चालू राहिल्यास वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही.
माझ्या रंगसभेस मन:पूर्वक शुभेच्छा."
डॉ. लक्ष्मण देशपांडे  
       "वाचनालय, ग्रंथालय म्हणजे उर्जास्त्रोत असतो. पॉवरस्टेशन, येथून निघालेल्या प्रवास मनात मग गावात चेतना निर्माण करतो रंगसभेच्या साहाय्याने राबवलेल्या स्पर्धा आणि उपक्रम हयातून वसमतकर स्वत:चा चेहरा मोहरा लाभायची शक्यता असते . इथे झालेले बीजारोपणच, विचार व कलेचा वटवृक्ष निर्माण करणारे. त्यासाठी संबधिताचे स्वागत. अभिनंदन."
विठ्ठल वाघ   (सुप्रसिध्द कवी )
       "रंगसभा प्रतिष्ठानच्या वतीने होणाऱ्या वार्षिक समारंभानिमित्त वाचनालयास भेट देण्याचा योग आला. र्इब्राहिम हा माझा जुना मित्र आहे. तो विध्यार्थी असताना त्याची नेहमी भेट डावरे मॅडम यांच्याकडे होत असे. मध्ये बरेच दिवस भेट झाली नाही. आज या वाचनालयाच्या आणि रंगसभेच्या उपक्रमाच्या निमित्ताने पुष्कळ दिवसानंतर भेट झाली. त्याचा प्रामणिकपणा आणि कामाप्रती निष्ठा हे त्याचे गुण अजुनही तसेच आहेत. त्याला आणि सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा!"
प्रा.इंद्रजित भालेराव   (सुप्रसिध्द कवी )
       "ग्रंथांचा श्वास घेणारं हे वाचनालय वाचकांची मनं तरतरीत ठेवण्यात धन्यता मानणारं आहे, हे न सांगताही अनुभवता येतं. फार प्रसन्न वाटलं. सर्वांना धन्यवाद !"
फ.मुं.शिंदे   ( सुप्रसिध्द कवी )
       "ग्रामीण भागातील अत्यंत तळमळीने चालविले जाणारे हे, ग्रंथालय पाहून अतिशय आनंद झाला. ग्रंथालयाचे संचालक मंडळ ध्येयवादी वृत्तीचे आहे. त्यामूळे अल्पावधीत हे ग्रंथालय नावारूपाला आले आहे. ग्रंथालयाचे संगणकीकरणही झालेले आहे.ग्रामीण भागात सहसा न दिसणारी अशी गोष्ट आहे. इतर ग्रंथालयांनी या ग्रंथालयाचा आदर्श घेतला पाहिजे असे मला वाटते. ग्रंथालयास शुभेच्छा. "
डॉ.नागनाथ कोत्तापल्ले   (अध्यक्ष,अ.भा.म.सा.संमेलन )
       "श्री गुरु ईश्वर शिवाचार्य महाराज सार्वजनिक वाचनालय वसमत. या इतर 'ब' ग्रंथालय १८ व्या वर्धापनदिन, र्इ-ग्रंथालय संगणक प्रणाली उदघाटन समारंभाच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोत्तापल्ले सर यांच्या विचारांची मेजवाणी ऐकावयास मिळाली. ग्रंथालयाने अल्पावधीतच चांगली प्रगती केली. दर्जेदार ग्रंथसंपदा, संगणकीकृत सेवा या बाबी पाहुन आनंद वाटला. या प्रगतीत ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रंथालयाच्या भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा!"
अ.म.गाडेकर   ( सहायक, ग्रंथालय संचालक, औरंगाबाद )
       "गुरू ईश्वर शिवाचार्य महारज सार्वजनिक वाचनालय वसमत येथे आज वाचनालया चे काम बघुन फारच आनंद झाला. सचोटीने व गांभीर्याने हया चळवळीकडे बघणारे फरच थोडे वाचनालय व या क्षेत्रात काम करणारे मानस सापडतात हे वाचनालय तर सर्वच बाबतीत मोलाचे कार्य करत आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा."
प्रकाश होळकर   (कवी व चित्रपट गीतकार )
       "दुपारी तडपडणारे उन्ह नी सकाळी बोचणारी पहाट थंडी, यातून मनाला विसावा देणारे 'ईश्वर ग्रंथालय' हे पुस्तकांच्या शांत निरामय जीवनात तुम्हाला प्रवेश करायला लावते ती अक्षर वेळ असते. ११ हजाराच्या आसपास पुस्तके , वाचनासाठी वेगळा कक्ष पुस्तकांचे संगणिकिकरण आणि ग्रंथालयाची वेबसाईट अशा अधावत सोयीसह जेव्हा एखादे ग्रंथालय तुमच्यातले शांतप्रिय, अक्षरप्रिय, व्यक्तिमत्व जागे करतेतेंव्ह एखादे आनंदाचे डोही आपण असतो. एका कार्यक्रमासाठी आलेला मी इथे फार दुपारी येऊन पुस्तकांच्या सावलीत विसावलो, तेव्हा कुठे शांत झालो, ग्रंथालयाला शुभेच्छा देताना मी नकळत मराठवाड्याचा होतो."
अरुण म्हात्रे   (कवी व चित्रपट गीतकार )

ठळक बाबी :


  Copywrite 2013 ishwargranthalaya
Design by Uma